शेळी ने जास्त चारा खाण्यासाठी काय करावे
चारा कमी खाणं बहुतेक वेळा पोट बिघडणे, जंत, दातांचा त्रास किंवा चाऱ्याची चव न आवडणे यामुळे होतं. आधी ताजा हिरवा चारा, कोरडा चारा आणि थोडं दाणेदार खाद्य एकत्र द्या. स्वच्छ पाणी कायम ठेवा. खुराकात दोन टक्के खनिज मिश्रण आणि एक टक्का मीठ मिसळा. जंतनाशक वेळेवर द्या. चारा अचानक बदलू नका. दोन दिवसांत भूक वाढली नाही, ताप आला किंवा जुलाब सुरू झाले तर पशुवैद्याला दाखवा.
Region: Hingni BK B.O, BEED, MAHARASHTRA

